IND vs NZ Final : रोहित शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम; न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये नाणेफेक हरल्यानंतर स्पष्ट म्हणाला...
IND vs NZ Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs NZ Final Rohit Sharma loses toss
1/8
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2/8
न्यूझीलंडच्या प्लेइंग-11 मध्ये मॅट हेन्रीची जागा नॅथन स्मिथने घेतली आहे. तर भारताने कोणतेही बदल केलेले नाहीत.
3/8
नाणेफेक जिंकल्यानंतर किवी कर्णधार मिशेल सँटनर म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करू.
4/8
रोहित शर्माने सलग 12 व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे.
5/8
दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, त्याला नंतर फलंदाजी करण्यात कोणतीही अडचण नाही. त्यात फारसा बदल झालेला नाही, आम्ही याआधी धावांचा पाठलाग केला आहे आणि जिंकलो पण आहे.
6/8
पुढे रोहित म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये आम्ही टॉसची चिंता करत नाही आणि फक्त चांगले खेळा याबद्दलच बोलतो, आम्ही तेच केले आणि आज देखील आम्हाला तेच करायचे आहे.
7/8
अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्यामुळे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक नाणेफेक गमावणारा कर्णधार बनला आहे आणि ब्रायन लाराची बरोबरी केली.
8/8
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक म्हणजे सलग 12 वेळा टॉस गमावण्याचा लाजिरवाणा विक्रम लाराच्या नावावर आहे.
Published at : 09 Mar 2025 02:39 PM (IST)