IND vs ENG Prasidh Krishna Shameful Record: लज्जालाही लाजवेल असा प्रसिद्ध कृष्णाचा लाजिरवाणा विक्रम, बनला पहिला गोलंदाज, नेमकं काय घडलं?

IND vs ENG Prasidh Krishna Shameful Record: प्रसिद्ध कृष्णाने ऑली पोप, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथच्या रूपात 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तरीही त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

IND vs ENG Prasidh Krishna

1/5
IND vs ENG Prasidh Krishna Shameful Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ऑली पोप, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथला बाद करत तीन विकेट्स पटकावल्या. मात्र प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
2/5
प्रसिद्धने पहिल्या डावात 20 षटके टाकत 3 विकेट्स घेतल्या. मात्र त्याची इकॉनॉमी खूपच खराब होती.
3/5
प्रसिद्धने 6.40 च्या इकॉनॉमीने 128 धावा दिल्या. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा हा भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बनला आहे.
4/5
प्रसिद्ध हा एका डावात किमान 20 षटके टाकणारा आणि प्रति षटक 6 पेक्षा जास्त धावा देणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.
5/5
यापूर्वी हा नकोसा विक्रम वरुण आरोनच्या नावावर होता, ज्याने 2014 मध्ये अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत 5.91 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.
Sponsored Links by Taboola