Harry Brook England Captain : जोस बटलरच्या 'विराट' युगाचा अंत! इंग्लंडकडून वनडे अन् टी-20 संघासाठी नव्या कॅप्टनची घोषणा
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

Harry Brook New England white-ball captain
1/8
इंग्लंड क्रिकेट संघाला एकदिवसीय आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार मिळाला आहे.
2/8
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
3/8
जोस बटलर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत इंग्लंडच्या व्हाईट बॉल संघाचा कर्णधार होता, परंतु संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर त्याला कर्णधारपद सोडावे लागले.
4/8
आता ईसीबीने हॅरी ब्रूकला मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.
5/8
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत मीडिया रिलीज जारी करून म्हटले आहे की, हॅरी ब्रूकची इंग्लंड पुरुष व्हाईट बॉल संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6/8
गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून इंग्लंडच्या लवकर बाहेर पडल्यानंतर जोस बटलरने राजीनामा दिला होता, त्याऐवजी ब्रूकची नियुक्ती करण्यात आली आहे.
7/8
जानेवारी 2022 मध्ये पदार्पण केल्यापासून 26 वर्षीय ब्रूक इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
8/8
त्याला सर्व फॉरमॅटमध्ये देशातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक मानले जाते.
Published at : 07 Apr 2025 05:11 PM (IST)