Ind vs Eng 5th Test : ऋषभ पंतसारखा जिगरबाज योद्धा; एक हात मोडला, पण दुसऱ्या हाताने लढला! पण इंग्लंडला जिंकू नाही शकला
Chris Woakes News : मोहम्मद सिराजच्या करिष्माई कामगिरीने सोमवारी इंग्लंडला सहा धावांनी हरवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

Chris Woakes News Ind vs Eng 5th Test
1/8
मोहम्मद सिराजच्या करिष्माई कामगिरीने सोमवारी इंग्लंडला सहा धावांनी हरवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.
2/8
पण, इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला सलाम, जो एक हात मोडला, पण दुसऱ्या हाताने लढला.
3/8
इंग्लंडने दुसऱ्या डावात 357 धावांत 9 बळी गमावले. त्यानंतर ख्रिस वोक्स एका हाताने स्वेटर घालून फलंदाजी करण्यासाठी आला.
4/8
पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना ख्रिस वोक्सला दुखापत झाली होती.
5/8
त्यानंतर त्याने गोलंदाजी केली नाही आणि पहिल्या डावात फलंदाजीही केली नाही.
6/8
पण, त्यानंतर जेव्हा संघाला दुसऱ्या डावात वोक्सची गरज होती, तेव्हा तो फलंदाजीला आला.
7/8
खांद्याच्या दुखापती असूनही, ख्रिस वोक्स एका हातात बॅट धरून शेवटचा फलंदाज म्हणून क्रिजवर उभा होता.
8/8
पण, सिराजच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला 367 धावांवर गुंडाळले आणि रोमांचक विजय मिळवला.
Published at : 04 Aug 2025 06:29 PM (IST)