एक्स्प्लोर
Cheteshwar Pujara Retirement : भारताच्या कसोटी संघाचा कणा, 2 वर्षांपासून संघाबाहेर; कशी राहिली चेतेश्वर पुजाराची कारकीर्द, शेवटी भावूक पोस्ट, म्हणाला...
Cheteshwar Pujara Announces Retirement News : चेतेश्वर पुजारा यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 20 वर्षांचा त्याचा क्रिकेट प्रवास अखेर संपला.
Cheteshwar Pujara Retirement News
1/10

चेतेश्वर पुजारा यांनी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 20 वर्षांचा त्याचा क्रिकेट प्रवास अखेर संपला. या दोन दशकांत त्याने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं.
2/10

पुजाराने 2005 साली घरेलू क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांचा पहिला सामना सौराष्ट्र आणि विदर्भ यांच्यातील रणजी ट्रॉफीचा होता. खास बाब म्हणजे त्याने फेब्रुवारी 2025 मध्ये गुजरातविरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या करिअरमधील शेवटचा फर्स्ट क्लास सामना ठरला.
3/10

चेतेश्वर पुजाराला भारताच्या कसोटी संघाचा कणा म्हटले जातं होते, पण तो 2 वर्षांपासून संघाबाहेर होता. भारतासाठी पुजाराने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता.
4/10

चेतेश्वर पुजारा याने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने एक भावनिक पोस्ट लिहिलं की, "भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणं अशक्य आहे.
5/10

पुढे त्याने लिहिले की, पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!"
6/10

2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले.
7/10

पुजाराचा फर्स्ट क्लास क्रिकेट प्रवास : 278 सामने, 21301 धावा, 66 शतकं
8/10

पुजाराचा लिस्ट-ए क्रिकेट प्रवास : 130 सामने, 5759 धावा, 16 शतकं
9/10

पुजाराचा टी20 क्रिकेट प्रवास : 71 सामने, 1556 धावा, 1 शतक
10/10

भारताकडून त्याने 103 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले. एकूण 108 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने 7200 पेक्षा जास्त धावा केल्या. कसोटीत पुजाराने 19 शतकं झळकावली असून त्याचा सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या नाबाद 206 अशी आहे.
Published at : 24 Aug 2025 12:20 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
महाराष्ट्र


















