BCCI New Jersey Sponsor : न्यू जर्सी स्पॉन्सरची डील इतक्या कोटींची?, Dream11 ने माघार घेतल्यानंतर अहवालात मोठा खुलासा; आकडा ऐकून डोळे चक्रावतील
ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक विधेयक आणलं आहे.

bcci new jersey sponsorship deal News
1/9
ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक विधेयक आणलं आहे. त्याचे नाव ‘ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल’ असं आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले हे झाल्यामुळे ड्रीम 11 ला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाशी (BCCI) असलेला करार तोडावा लागला.
2/9
आता आशिया कप 2025 जवळ आला असल्याने बीसीसीआयवर नवीन स्पॉन्सर शोधण्याचा दबाव वाढला आहे.
3/9
दरम्यान एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, बोर्ड 2025 ते 2028 या कालावधीसाठी नव्या प्रायोजकाची निवड करण्याच्या तयारीत आहे.
4/9
ही नवी डील तब्बल 452 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
5/9
ड्रीम 11 ने 2023 मध्ये बीसीसीआयसह जवळपास 358 कोटी रुपयांचा करार केला होता.
6/9
माहितीनुसार, बीसीसीआय 2025 ते 2028 या कालावधीत नव्या स्पॉन्सरशी करार करण्याचा विचार करत आहे. या दरम्यान टीम इंडिया सुमारे 140 सामने खेळणार आहे.
7/9
बीसीसीआयने प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी 3.5 कोटी रुपये, तर ICC आणि ACC स्पर्धांमधील प्रत्येक सामन्यासाठी 1.5 कोटी रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. ही रक्कम ड्रीम 11 पेक्षा जास्त असली तरी बायजूसच्या डीलपेक्षा कमी आहे.
8/9
आशिया कपच्या आधीच बीसीसीआयला नवा स्पॉन्सर जाहीर करायचा आहे.
9/9
पण वेळ कमी असल्याने आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन स्पॉन्सरचे नाव दिसण्याची शक्यता कमी आहे.
Published at : 01 Sep 2025 07:07 AM (IST)