एक्स्प्लोर
BCCI announced India squad for Tour of Australia News : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची तगडी टीम BCCI कडून घोषित!
BCCI announced India squad for Tour of Australia News : भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.
BCCI announced India squad for Tour of Australia News
1/9

BCCI announced India squad for Tour of Australia News : भारतीय संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.
2/9

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे, पण शुभमन गिल कर्णधार असणार आहे. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला आहे.
3/9

हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पार पडणार असून यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जातील.
4/9

ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ - सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
5/9

यावेळी वनडे संघासाठी नवीन कर्णधाराचीही घोषणा करण्यात आली. आता शुभमन गिल कसोटीसोबतच वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. म्हणजेच रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून संघात सामील होणार आहे.
6/9

विशेष म्हणजे, रोहित शर्मा सोबतच विराट कोहलीचीही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांनीही भारतासाठी शेवटचा सामना 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता.
7/9

ऋषभ पंतही या मालिकेतून बाहेर आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याही दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाही.
8/9

जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तो सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
9/9

भारतीय वन डे संघ - शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
Published at : 04 Oct 2025 04:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















