Solar Eclipse 2020 | देशाच्या वेगवेगळ्या भागात दिसलं सूर्यग्रहण, पाहा सूर्यग्रहणाची मनमोहक दृश्यं
आज सूर्यग्रहण आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सूर्यग्रहण सुरु झालं. 3 वाजून 3 मिनिटांनी ग्रहण संपणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी जम्मू काश्मीरमध्ये ग्रहण असं दिसलं.
नवी दिल्लीत सूर्यग्रहण असं दिसलं. ढगाळ वातावरणामुळं ग्रहण दिसायला अडचणी येत आहेत.
देशात काही ठिकाणी सूर्यग्रहणामुळं दिवसाच अंधार पडणार आहे. हे ग्रहण जवळपास सहा तासांच आहे.
राज्याची राजधानी मुंबईत ग्रहण असं दिसलं.
गुजरातमधील गांधीनगरमध्ये सूर्यग्रहण असं दिसलं.
भारतात सर्वात आधी गुजरातमधील द्वारकेत ग्रहण दिसलं.
हे ग्रहण भारत, नेपाळ, पाकिस्तान, यूएई, इथोपिया आणि कांगो मध्ये दिसेल. भारतात हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर जयपुर, दिल्ली, चंडीगड, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, शिमला आणि लखनौ सारख्या शहरात काही प्रमाणात हे ग्रहण दिसणार आहे.
हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये ग्रहण असं दिसून आलं.
राजस्थानमधील जयपूरमधील दृश्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -