प्री-वेडिंग शूटपासून सुरु झाली आदित्य नारायणची लगीनघाई; खास सोहळ्यांचे फोटो व्हायरल
प्रसिद्ध गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणने आपली गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत आज आपली लग्नगाठ बांधणार आहे. लग्नापूर्वी आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक कार्यक्रम पार पडले आहेत.
आदित्य नारायण आणि श्वेता यांचा समारंभासाठी त्यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
आदित्य नारायणने पुढे बोलताना सांगितलं होतं की, लग्नाच्या तयारीत बीझी असल्यामुळे तो आपलं सोशल मीडिया अकाउंट बंद करत आहे.
आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं की, आम्ही लग्न करणार आहोत. मी फार भाग्यवान आहे की, मला श्वेता माझी आयुष्यभराची जोडीदार 11 वर्षांपूर्वीच भेटली आणि आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत.
आदित्यने साधारणतः महिनाभारपूर्वीच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आदित्य आणि श्वेता जवळपास 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत
लग्नाबाबत बोलताना आदित्य नारायणने सांगितलं होतं की, लग्नसोहळा 1 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभासाठी केवळ मित्र परिवार आणि कुटुंबातील काही व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात येईल.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आदित्य नारायण हा 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.
आदित्य आणि श्वेताचं प्री-वेडिंगही शूट झालं आहे. या समारंभांचे आणि प्री-वेडिंग शूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.