PHOTO | सुमन दाभोळकर- तळकोकणातील दगडांना जिवंत करणारा अवलिया!
सुमन दाभोलकर यांनी साकारलेल्या सोनू सूदची कलाकृती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, सोनू सूदनेही त्याच्या ट्विटरवर तो फोटो शेअर करुन कौतुक केलं.
मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ते कणकवलीमध्ये आपल्या गावी आले. गावी आल्यानंतर त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूला, गावांतील नदीकाठच्या दगडांना बोलत केलं.
कणकवलीमधील गडनदी काठी मिळालेल्या वेगवेगळ्या आकाराच्या दगडांवर त्यांनी पोर्टेट बनवली आहेत.
लॉकडाऊन झाल्यामुळे मुंबईतून गावी आलेल्या सुमन दाभोळकरने दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता त्यावर रंगांची उधळण करुन व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे साकारत दगडांना जिवंत करण्याची किमया साधली आहे.
सुमन दाभोळकर हे मूळचे सिंधुदुर्गातील कणकवलीमधले. आपल्या हातातील कलेने त्यांनी दगडांना मूर्त रुप दिलं.
सुमन दाभोळकर यांनी मुंबईत फाईन आर्टचे शिक्षण घेतलं. सध्या ते ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून काम पाहतात.
दगडावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती साकारताना सुमन यांना आनंद तर मिळताच त्यासोबत त्यांनी साकारलेली कलाकृती सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहेत.
पुढे पाहा सुमन दाभोळकर यांच्या इतर कलाकृती
त्यासोबत गिफ्ट, आईस्क्रीम, विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज असे 40 ते 50 प्रकारची कलाकृती दगडांवर साकारुन दगडांना जिवंत केलं आहे.
सुमन यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण बनवलेल्या कलाकृतीचा प्रदर्शन भरवायचं आहे.
नदीकाठी मिळणाऱ्या दगडांना आहे त्या रुपात रंगवून वैशिष्ट्यपूर्ण अशी विविध प्रकारचे कलाकृती बनवताना सुमन यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करायला आवडतं.
त्यांनी आतापर्यंत आईनस्टाईन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, हरभजन सिंग,नसिरुद्दीन शहा, सोनू सूद, अब्दुल कलाम असे अनेक कलाकृती साकारल्या आहेत.
सुमन दाभोळकर यांनी साकारलेल्या दगडांवरील कलाकृतींना मागणी सुद्धा आहे. त्यांच्या अनेक कलाकृती विकल्या गेल्या आहेत.