Shivrajyabhishek | रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा, पाहा सोहळ्याची क्षणचित्रं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला
अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात.
शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
6 जून 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो.
यंदा कोरोनाच्या सावटामुळं शिवप्रेमी रायगडावर पोहोचू शकले नसले तरी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणानं साजरा झाला.
: एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -