In Pics : शिवभक्ताने सातारच्या प्रवेशद्वाराजवळ उभारला छत्रपती शिवरायांचा 50 फुटी अश्वारूढ पुतळा
या सेल्फी पॉईंटमुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे देखील उदयनराजे यांनी सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा उद्देश आहे.
छत्रपती घराण्याचे 13 वंशज खासदार उदयनराजे यांनी या सेल्फी पॉईंटचे अनावरण केले. या वेळी बोलत असताना उदयनराजे म्हणाले, मी माझे भाग्य समजतो की, मला या सेल्फी पॉईंटच अनावरण करण्याची संधी मिळाली.
मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर साताऱ्याच्या प्रवेशालाच पन्नास फुटी अश्वारुढ शिवभक्तांसाठी उभारण्यात आला असून या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे.
रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा हा या मागचा उद्देश आहे.
या महामार्गावरुन येणाऱ्या शिवभक्तांना कायम स्मरणात रहावे यासाठी हा सेल्फी पॉइन्ट उभारण्यात आला आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिवभक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -