राममंदिराच्या पायाभरणीसाठी पुण्यातून रांका ज्वेलर्सची शुद्ध चांदीची वीट अयोध्येला रवाना

ठाण्यातून 1987 साली महाराष्ट्रातून पहिली चांदीची वीट आयोध्या येथे पाठवण्यात आली होती. ठाण्यातील त्याकाळचे शिवसेनेचे अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे यांनी ती विट पाठवली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रद्धा आणि पावित्र्याचा हा सुंदर आविष्कार घडवण्याचे भाग्य रांका ज्वेलर्सला पुन्हा एकदा लाभल्याची भावना रांकांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येमध्ये दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी राममंदिराचा पायाभरणी सोहळा होत आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर व स्व. माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या स्मरणार्थ नवीन सिंग यांच्या परिवारातर्फे चांदीची वीट अयोध्येला पाठविण्यात आलेली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून नवरत्नांचे महत्व आहे. नवग्रहांच्या शांतीसाठी आणि विशेष लाभांसाठी या नवरत्नांचे सहाय्य घेतले जाते. ज्यामुळे विघ्ने दूर होऊन शुभफले मिळतात असे ज्योतीषशास्त्र देखील सांगते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण चांदीच्या विटेचे वजन 1011 ग्रॅम आहे.
‘जय श्रीराम’ ही अक्षरे असलेली 99.99 टक्के शुद्ध चांदीची वीट नुकतीच पुण्याहून अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे. या विटेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू, नीलम अशी नवग्रहांची नवरत्ने देखील जडवण्यात आलेली आहेत.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा सोहळ्यामध्ये आता पुणेकरांचाही लक्षणीय सहभाग असणार आहे. कारण या पायाभरणीमध्ये पुण्यातील पुणेकरांनी घडविलेल्या चांदीच्या विटेचा समावेश असणार आहे. समस्त पुणेकरांना अभिमान वाटावी अशी किमया रांका ज्वेलर्सने करून दाखवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -