In Pics : बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणानंतर सेलिब्रिटींचं पार्टी सत्र सुरू, रकुल प्रीत, सारा, करन जोहरचे फोटो व्हायरल
कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि बॉलीवूड प्रकरणानंतर बॉलीवूड सेलिब्रिटी आता पुन्हा भेटू लागले आहेत आणि पूर्वीप्रमाणे सेलिब्रिटी पार्ट्यांचं सत्र आता पुन्हा सुरू झालंय.
ड्रग्जप्रकरणी अनेक सेलिब्रिटींची चौकशीही सुरू झाली, मात्र या प्रकरणानंतर काही काळ सेलिब्रिटींच्या भेटीगाठी इतक्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या नाहीत.
नुकतच मनीष मल्होत्राच्या घरी सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, कियारा अडवाणी, करण जौहर आणि परिणिती चोपडा पार्टीसाठी पोहोचले. या पार्टीमधील काही खास फोटो सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी शेअर केले.
या पार्टीसाठी कियारा अडवाणी स्टायलिश कॅम्पी लूकमध्ये दिसत होती. नियॉन ग्रीन फ्लेर्ड पॅन्ट्स अ आणि पांढरा क्रॉप टॉप विथ जॅकेट असा लूक तिने केला होता.
ड्रग्जप्रकरणी अनेक सेलिब्रिटींची चौकशीही सुरू झाली, मात्र या प्रकरणानंतर काही काळ सेलिब्रिटींच्या भेटीगाठी इतक्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या नाहीत.
सोशल मीडियावर सर्व सेलिब्रिटींच्या स्टाईलिश लूकची आणि या पार्टीची चर्चा होतेय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्ररणानंतर बॉलीवूड पार्ट्यांवर सर्वांचीच नजर आहे. बॉलीवूड ड्रग्जच्या अनेक पार्ट्या या प्रकरणानंतर समोर आल्या जिथे ड्रग्जचं सेवन केलं जात होतं.
त्याचबरोबर साराचा व्हाईट जंप सूट चाहत्यांसाठीही खूप चर्चेत आला, जम्प सूटसोबत फ्लॅट व्हाईट सॅंडल्समध्ये सारा दिसली.
या पार्टीमध्ये केवळ बॉलीवूडच नाही तर साऊथ सुपरस्टार, अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडादेखील उपस्थित होता. पार्टीमध्ये रकुल, परिणिती, सारा आणि कियारा यांनी स्टायलिश ड्रेस परिधान केले होते.
परिणीती चोप्रा हिनीही या पार्टीत हजेरी लावली होती. परिणीती ब्लॅक लेदर पॅन्ट्स, व्हाईट शॉर्ट टॉप अशा कूल लूकमध्ये दिसली.