✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तेलंगणात पावसाची कोसळधार; अनेक भागांत पूरस्थिती, रस्त्यांना नद्यांचं रुप

एबीपी माझा वेब टीम   |  15 Oct 2020 10:31 AM (IST)
PHOTO : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तेलंगणात पावसाची कोसळधार; अनेक भागांत पूरस्थिती, रस्त्यांना नद्यांचं रुप
1

हा फोटो हैदराबाद येथील सिंगनेर कॉलनी येथील आहे. जेसीबीच्या मदतीने प्रभावित भागांतील लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

2

आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोक बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

3

हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी लोक अडकून पडल्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. तसेच काही भागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

4

हा फोटो हैदराबादमधील दुर्गम चेरुवु केबल ब्रीजचा आहे. मुसळधार पावसामुळे चारही बाजूंनी पाणीच पाणी साचलं आहे. फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, पावसामुळे येथील परिस्थिती किती गंभीर झाली आहे.

5

मुसळधार पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. शहरातील रस्त्यांना जणू नदीचं रूप घेतलं आहे. अनेक ठिकाणी गाड्या साचलेल्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे सामानचं नुकसान झालं आहे.

6

महाराष्ट्र, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगना या दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आतापर्यंत जवळपास, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा फोटो हैदराबाद येथील हिमायत सागर येथील आहे. जवळपास एका दशकानंतर याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • भारत
  • PHOTO : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तेलंगणात पावसाची कोसळधार; अनेक भागांत पूरस्थिती, रस्त्यांना नद्यांचं रुप
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.