पवित्र पुरुषोत्तम मास : कमला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट
अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेल्या या आकर्षक फुल सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचे रुपडे पालटून गेले आहे .
आज अधिक महिन्यातील कमला एकादशीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते आणि याचेच औचित्य साधून पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी 15 प्रकारच्या फुलांची आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
पवित्र पुरुषोत्तम मासातील कमला एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील भाविक राम जांभुळकर यांनी ही आकर्षक सजावट केली आहे.
या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.
या ससजावटीत गुलाब, आर्चिड, झेंडू, ग्लॅडीओ, जरबेरा, तगर, मोगरा, कामीनी, तुळशी, अष्टर, शेवंती अशा प्रकारच्या फुलांचा आणि पानांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.
विठ्ठल सभामंडपात कमला एकादशीनिमित्त विठूरायाची आकर्षक रांगोळीही घातली असून इतर ठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर भाविकांना बंद असले तरी देवाचे नित्योपचार आणि महत्वाचे सण उत्सव परंपरेनुसार साजरे करण्यात येत आहेत.