पंतप्रधान मोदींचं सरप्राईज, जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी अचानक लेहमध्ये दाखल
भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं सरप्राईज दिलं. सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहमध्ये पोहोचले. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान लेह लडाखमध्ये दाखल झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या वेळी पंतप्रधान मोदी, सैन्याचे अधिकारी संबोधित करत होते, तेव्हा तिथे मोठ्य संख्याने जवान उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी सकाळी लेह लडाखमधील ज्या ठिकाणी पोहोचले, त्याचं नाव नीमू आहे. मोदींनी तिथे लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत बातचीत केली.
पंतप्रधान सकाळी लेहमध्ये पोहोचले आणि जवानांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे याआधी फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचाच लेह दौरा पूर्वनियोजित होता. मे महिन्यापासून सीमेवर चीनसोबत तणाव सुरु असून परिस्थिती गंभीर आहे. त्यातच पंतप्रधान मोदीही त्यांच्यासोबत लेहमध्ये पोहोचल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.
विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. मोदींचा हा दौरा चीनला एकप्रकारे संदेशही आहे की, देश आपल्या सैन्याच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. पंतप्रधान मोदींसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -