PM Modi speech in Parliament Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

सुरुवातीला कृषी सुधारणांना समर्थन देणारे आता यू टर्न घेत आहेत असं सांगत आंदोलकांना समजावून सांगून देशाला पुढे घेऊन जावं लागेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या देशात आंदोलनजीवी नावाची एक वेगळी जमात आहे. ही मंडळी देशातील सर्वच आंदोलनात दिसतील. अशा लोकांना आपण ओळखलं पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो.
राष्ट्रपतींचं अभिभाषण मार्ग दाखवणारं ठरलं आहे. संपूर्ण विश्व संकटांचा सामना करत आहे. कोरोना संकटाचा कुणी विचारही केला नसेल अशा काळात आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील राज्यसभेतील संबोधनावर आज सर्वांच लक्ष लागलं होतं. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला.
शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, त्यांचा विरोध असलेल्या मुद्द्यावर आम्ही चर्चा करायला तयार असल्याचं मोदी म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -