Photo Gallery | ठाण्यात सुपर बाईक्सची रॅली
सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे असे आवाहन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी सर्वाना केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्वतः एक परदेशी गाडी चालवून आपला सहभाग नोंदवला.
सह पोलिस आयुक्त श्री सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेते मकरंद अनासपूरे आणि माझ्या नवऱ्याची बायको या सीरियलमधील अभिजीत खांडकेकर, अनिता दाते या कलाकारांनी बाईकर्सचा उत्साह वाढवण्यासाठी या सोहळ्याला हजेरी लावली लावली.
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या संचलनासाठी हिरवा झेंडा दाखवला.
ठाणे शहरातील कोर्ट नाका परिसरातून सुपर बाईक्सच्या संचलनाला सुरूवात होऊन संपूर्ण शहराची परिक्रमा करून रॅलीची सांगता कोर्टनाका येथे झाली.
हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया अशा अनेक आकर्षक बाईक्स पाहायला मिळाल्या.
गेल्या रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणाऱ्या ठाणेकरांना आज जवळपास 300 सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवयाला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -