In Pics | माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरु, संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणामुळे चर्चत आलेले महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजातील नेते, महंत आणि अनेक लोक संजय राठोड यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचं चित्र आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं.
गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरु आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असं संजय राठोड म्हणाले.
सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकरणात संजय राठोड चर्चेत आले होते.
संजय राठोड हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म सतत निवडून येत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांपैकी एक आमदार म्हणजे संजय राठोड होय.
एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चर्चेत आलेल्या संजय राठोड हे आज पोहरादेवीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -