सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हातात जेव्हा बॅट असते.. पाहा फोटो

सरन्यायाधीश शरद बोबडे हे न्यायदानाच्या पलीकडे त्यांच्या छंदासाठी ओळखले जातात. बाईक चालवणे अन् क्रिकेट खेळणे हे त्यांचे आवडते छंद.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डावखुरी खेळ खेळत त्यांनी फटकेबाजी केली. ते धावत रन घेतानाही दिसले. मात्र, शेवटी 2 चौके लावत, 13 धावांवर ते झेलबाद झाले.

सरन्यायाधीश नागपुरात पुन्हा एकदा क्रिकेटरच्या रुपात मैदानावर पाहायला मिळाले.
तिसऱ्या क्रमांकावरचे बॅट्समन म्हणून सरन्यायाधीश शरद बोबडे हे जजेसच्या टीमकडून आले.
टी शर्ट, हातात ग्लोव्ज आणि बॅट, गुडघ्याला पॅड लावून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पिचवर ते बॅट्समन म्हणून उतरले. बार विरुद्ध बेंच असा ही सामना नागपुरात दरवर्षी होतो.
गेल्या वर्षी सारखेच ह्या वर्षीही सरन्यायाधीश खेळायला बेंचच्या टीमकडून मैदानात उतरले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -