In Pics: दिया मिर्झाच नव्हे तर या अभिनेत्रींनीही केला आहे दुसरा विवाह
गेल्या वर्षी अभिनेत्री काम्या पंजाबीने दिल्लीचा उद्योगपती शलभ डांगशी दुसरा विवाह केला होता. त्या आधी तिने 2003 साली बंटी नेगीशी विवाह केला होता. दहा वर्षाच्या संसारानंतर 2013 तिने घटस्पोट घेतला.
अभिनेत्री किरण खेरने अनुपम खेरशी दुसरं लग्न केलं आहे. तिच्या पहिल्या पतीचं नाव गौतम बेदी असून तो उद्योगपती आहे.
अभिनेत्री निलमने पहिल्यांदा ब्रिटनमध्ये उद्योगपती असलेल्या ऋषी सेठीयाशी विवाह केला होता. काहीच वर्षात त्यांचा संसार मोडला आणि निलमने अभिनेता समीर सोनीशी दुसरा विवाह केला.
टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचेही दोन लग्नं झाली आहेत. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे. 2013 साली तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं आहे.
अर्चना पूरण सिंहचा पहिला विवाह मोडल्यानंतर तीने पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही काळानंतर तिने परमीतशी दुसरा विवाह केला.
प्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोराचा पहिला विवाह अरबाज खानशी झाला होता. आता तिने घटस्पोट घेतला असून अर्जुन कपूरशा डेट करते. त्यांनी अजूनही लग्न केलं नसलं तरी त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
योगिता बाली ही किशोर कुमारची तिसरी पत्नी होती. तिने नंतर मिथूनशी दुसरा विवाह केला.
प्रसिद्ध अभिनेत्री रेणूका शहाने ही अभिनेता आशुतोष राणाची पत्नी आहे. हा तिचा दुसरा विवाह असून विजय कनकरे नावाच्या एका व्यक्तीशी तिचा पहिला विवाह झाला होता.
दिया मिर्झाने 2019 साली तिचा पहिला पती साहिलशी घटस्पोट घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दिया मिर्झा मुंबईमधील उद्योगपती वैभवसोबत आपला दुसरा विवाह करणार आहे.