Photo | राजकारणातील 'यारों के यार', 80 वर्षाचे 'तरुण' राजकारणी शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांचं बोट धरुन आपण राजकारणात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हंटलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटत नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशा वेळी युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करावी अशी अनेक विरोधी पक्ष नेत्यांची इच्छा आहे. या परिस्थितीत सध्या शरद पवारच भाजपला आव्हान देवू शकतात असं अनेक विरोधी पक्ष नेत्यांना वाटतंय.
पूर असो वा दुष्काळ, बळीराजावर संकट येतात शरद पवार त्या ठिकाणी तातडीनं धाव घेतात.
कोणीही कितीही मोठा पैलवान असला तरी आपणही कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहोत असं सांगत त्यांनी राजकारणात अनेकांना चितपट केलं.
वयाची आठ दशके पार करत असताना शरद पवार आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा सर्वांना कायमच प्रेरणा देते. आजही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचा त्यांचा कामाचा धडाका आहे. कृषीमंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेत.
सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शरद पवारांनी राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस अशी मोट बांधली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं आणि भाजपला मात देता येऊ शकते हा संदेश देशभर दिला.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना तयार केलं आणि अशक्य ते शक्य करुन दाखवलं.
गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीसोबत सातारा लोकसभा पोटनिवडणूक लागली होती. त्यामध्ये भाजपच्या उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. आपल्या या मित्राचा प्रचार करताना शरद पवारांनी पावसात वादळी सभा घेतली. नंतर हा फोटो महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रचंड व्हायरल झाला. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.
शरद पवारांनी देशातील आणि राज्यातील अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांशी सौदार्हाचे संबंध ठेवले. त्यामुळेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी अनेक नेते शरद पवारांकडे धाव घेतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -