In Pics | ड्रायव्हिंगचा अनोखा अनुभव देणारी Citroen C5 Aircross
पॉवर्ड ड्रायव्हर सीट, LED हेडलॅम्प, पॅनोरॅमिक सनरुफ, हॅन्ड फ्री टेलगेट ओपनिंग, फ्रन्ट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा, पड्डल लॅम्प, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एयर क्वॉलिटी सिस्टम आणि इतर अनेक सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कारमध्ये 2.0 डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच 8- स्पीड ऑटोमॅटिक गीयर बॉक्सची सुविधा आहे. त्यामुळे एक क्वॉलिटीच्या ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल.
यात वापरण्यात आलेलं मटेरियल हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहे. या कारची इंटेरियर आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. आठ इंचाचा टचस्क्रीन आणि 12.3 इंचाची TFT डिजिटल क्लस्टरची सुविधा या कारमध्ये देण्यात आली आहे.
ही कार दिसायला तर आकर्षक आहेच पण याचे इंटेरियर हे युनिक पद्धतीचे आहे. या कारणासाठी Citroen C5 Aircross ही कार खरेदी करायला काही अडचण नाही.
स्टीअरिंग व्हील हे जाड प्रकारचे असले तरी वापर करण्यास ते अगदी स्मूथ आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगचा एक अनोखा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
वेगळ्या फ्रेन्च पद्धतीचे डिझाईन, कॉम्पॅक्ट लूक पण मोठी स्पेस आणि इतर अनेक वैशिष्ट्ये ही Citroen C5 Aircross ला इतर SUV गाड्यांपासून वेगळं बनवते.
या कारची गुणवत्ता, स्पेस, इंटेरियर, ड्रायव्हिंग क्वॉलिटी या गोष्टी चांगल्या असल्या तरी आवाज करणारे इंजिन आणि भारतात पेट्रोल इंजिनची कार उपलब्ध नसणे या गोष्टी कुठेतरी खटकतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -