PHOTO | पैठणी शेल्यावर साकारले बाळासाहेब ठाकरे
पैठणीचं शहर असलेल्या येवला आणि परिसरात अनेक पैठणी विणकर वेगवेगळ्या कलाकृती पैठणीवर साकारत असतात. एका तरुणाने पैठणी विणकाम शिकल्यानंतर पैठणीच्या शेल्यावर दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आकर्षक कलाकृती साकारली आहे.
परिस्थिती जेमतेम असल्याने योगेशने गावातच पैठणी विणकामाच शिक्षण घेतले आणि कर्ज काढून घरातील पत्राच्या शेडमध्ये स्वत:चा माग टाकला.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनमुळे त्याचं काम थांबले. अशा परिस्थितीत काही तरी करावे म्हणून त्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र शेल्यावर काढण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्याला पाच हजार रुपयांचा खर्च आला आहे. पंधरा दिवसात शेल्याच्या दोन्ही बाजूने त्याने बाळासाहेबांचं चित्र तयार केले.
हा शेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्याची इच्छा असल्याचं योगेशने सांगितलं.
येवला तालूक्यातील आंदूर येथील योगेश गायकवाड तरुणाने ही पैठणी तयार केली आहे.