In Pics: शिवरायांचे बलाढ्य किल्ले हीच खरी स्मारकं, संवर्धनाची गरज
ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवरायांच्या जीवनात स्वराज्याची राजधानी रायगडचे महत्व मोठं आहे. आज त्याच किल्ल्यावर शिवरायांचे दोन दिमाखदार पुतळे बसवण्यात आले आहेत.
जवळपास पावणे चारशे वर्षानंतरही हे किल्ले वादळ-वारे सोसत उभे आहेत. ते शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.
या किल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याकरता राज्यात अनेक संघटना आणि शिवप्रेमी झटत आहेत.
शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यांचा वापर केला. त्यामुळे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुलाही ते चकवा देऊ शकले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात.
उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -