PHOTO | आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई
आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यंदा कोरोनामुळे यात्रा जरी भरणार नसली तरी मंदिर मात्र विविध रंगी दिव्याने झगमगून निघाले आहे.
पुणे जिल्ह्यातील विनोद जाधव या भक्ताने विठूरायाची राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकली आहे. मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकार केली आहे.
यंदा प्रथमच विठ्ठल मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक पद्धतीने उंची झुंबर, पडदे लावत चक्क मंदिराला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे.
विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली असून याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडप देखील या रोषणाईने उजळून गेला आहे.
मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाईस आता सुरुवात केली असून विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे.
नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने LED दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली असून मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे.