काय सांगता? 'हा' प्राणी आहे झाडांपेक्षा सुद्धा जुना; जाणून घ्या!
झाड जसं मानवी जीवन वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे, तसच पाण्यातील जीव वाचवण्यासाठीही एका प्राण्याची उत्पत्ती 40-45 कोटी वर्षांपूर्वी झाली, जो झाडांपेक्षाही जुना आहे, जाणून घ्या...

Sea creatures
1/8
शार्क (sharks) हे खूप जुने समुद्री मासे आहेत. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार शार्कसारखे मासे जवळजवळ 40 ते 45 कोटी वर्षांपूर्वी समुद्रात दिसायला लागले.
2/8
झाडं मात्र नंतर आली, साधारण 38 ते 40 कोटी वर्षांपूर्वी, त्यामुळे शार्क झाडांपेक्षा आधीची आहेत.
3/8
इतक्या वर्षांत पृथ्वीवर अनेक बदल झाले, अनेक प्रजाती नष्ट झाल्या, पण शार्क अजूनही टिकून राहिले.
4/8
शार्कच्या हाडांऐवजी त्यांच्या अंगात कार्टिलेज (cartilage) नावाचं मऊ हाडासारखं साहित्य असतं, त्यामुळे त्यांचं शरीर हलकं आणि पोहायला सोपं होतं.
5/8
आज जगात 500 पेक्षा जास्त प्रकारचे शार्क आढळतात आणि प्रत्येकाचा दिसणं, खाणं आणि वागणं वेगळं असतं.
6/8
ते समुद्रात मोठे शिकारी असल्यामुळे कमजोर किंवा आजारी मासे खातात आणि त्यामुळे समुद्राचं संतुलन टिकून राहतं.
7/8
पण त्यांची पिल्लं होण्याची गती कमी असल्यामुळे जास्त मासेमारी, पाणी प्रदूषण आणि अधिवास कमी होणं यामुळे बरेच शार्क धोक्यात आले आहेत.
8/8
जर शार्क जपले नाहीत तर समुद्राचं आरोग्य बिघडेल. म्हणूनच “शार्क झाडांपेक्षा जुने आहेत” हे फक्त गंमतीशीर तथ्य नाही, तर पृथ्वीच्या इतिहासाची खरी गोष्ट आहे.
Published at : 09 Sep 2025 03:10 PM (IST)