PHOTO : साता समुद्रा पार... नायजेरियात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी
Nigeria Shivjayanti : नायजेरियातील महाराष्ट्र मंडळ या संस्थेकडून यंदाचा शिवजंयती सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Nigeria Shivjayanti : नायजेरियातील महाराष्ट्र मंडळ या संस्थेकडून यंदाचा शिवजंयती सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1/9
यंदाची शिवजयंती राज्यभर तसेच देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. पण साता समुद्रापार, नायजेरियातही शिवजयंतीच्या सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
2/9
नायजेरियातील महाराष्ट्र मंडळ या संस्थेकडून यंदाचा शिवजंयती सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
3/9
महाराष्ट्र मंडळाकडून साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी 300 शिवप्रेमी उपस्थित होते.
4/9
हा शिवजयंती सोहळा Indian High Commission मध्ये साजरा करण्यात आला.
5/9
या वर्षीचे खास आकर्षण म्हणजे महाराजांची पालखीतून काढण्यात आलेली मिरवणूक.
6/9
या पालखीच्या सभोवती सर्व पुरुष, स्त्रिया आणि बच्चेकंपनी पारंपरिक वेशभूषेत, ढोल ताशांच्या गजरात महाराजांचा जयघोष करत होते.
7/9
त्यानंतर सभागृहात महाराजांना विराजमान करुन महाराजांच्या पराक्रमाची गाथा, गाणी, नृत्य आणि पोवाडे सादर करण्यात आली.
8/9
Indian High Commission Consulate General तसेच महाराष्ट्र मंडळ नायजेरियाचे पदाधिकारी यांची भाषणे आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.
9/9
महाराष्ट्र मंडळ नायजेरियाची स्थापना सन 1979 साली करण्यात आली. तेव्हापासून प्रामुख्याने शिवजयंती आणि गणेशोत्सव मंडळातर्फे साजरे होत आहेत.
Published at : 24 Feb 2025 07:56 PM (IST)