मुंबईतील सर्वात पॉश भागात असलेल्या मोहम्मद अली जिनांच्या 'साऊथ कोर्ट' बंगल्याचं नूतनीकरण होणार?
Muhammad Ali Jinnah south court Bungalow : मुंबईतील सर्वात पॉश भागातील असलेल्या मोहम्मद अली जिनांच्या साऊथ कोर्ट बंगल्याचं नूतनीकरण होणार?

Muhammad Ali Jinnah south court Bungalow
1/9
Jinnah south court Bungalow : पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांचा मुंबईतील मलबार हिलवर बंगला आहे.
2/9
मुंबईतील सर्वात पॉश मानल्या जाणाऱ्या भागात मोहम्मद अली जिनांचा अडीच एकरात बंगला आहे.
3/9
दरम्यान, सध्या बंगल्याच्या नूतनीकरण चर्चा सुरु झाली आहे. बंगल्याचे नुतनीकरण करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयासमोर एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
4/9
घनदाट झाडांच्यामध्ये वसलेल्या 2.5 एकरच्या बंगल्या मालमत्तेचे परराष्ट्र मंत्रालयाला राजकीय एन्क्लेव्हमध्ये रूपांतर करायचे आहे.
5/9
प्रशासनाने 2023 मध्ये या बंगल्याची डागडुजी आणि नुतनीकरण करण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
6/9
हा बंगला आर्किटेक्चर क्लाउड बेटली यांनी डिझाईन केला होता.
7/9
समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या या बंगल्यासाठी इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला होता.
8/9
मोहम्मद अली जिना यांच्या मलबार हिलवरील बंगल्याची किंमत 1 हजार कोटी रुपये असल्याचे बोलले जाते.
9/9
जिनांनी 1936 मध्ये हा बंगला बांधला होता. 2.5 एकरात असलेला हा बंगला युरोपियन पद्धतीने बांधण्यात आला होता.
Published at : 19 Apr 2025 12:50 PM (IST)