Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस! मृतांचा आकडा 1400 वर, जखमी 3000 हुन अधिक, पहा थरकाप उडवणारे फोटो
Aghanistan Earthquake: अफगाणिस्तानात पाकिस्तान सीमेच्या जवळ केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपात आतापर्यंत 1,400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 3,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Continues below advertisement
Aghanistan Earthquake
Continues below advertisement
1/12
अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान सीमेच्या जवळ रविवारी रात्री शक्तिशाली 6 तीव्रतेचा भूकंप झाला असून, मृतांचा आकडा 1,400 च्यावर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या 3,000 पेक्षा अधिक असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
2/12
सरकारी प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले की, “नुर्गल, चौकाय, चापा दरा, पिच दरा, वाटापूर आणि असदाबाद या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 1,411 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3,124 जखमी झाले आहेत. तब्बल 5,412 घरे उद्ध्वस्त झाली आहेत.”
3/12
प्रभावित भागांमध्ये बचावकार्य सुरु असून, पूर आणि ढिगाऱ्यांमुळे मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.
4/12
मुजाहिद यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर उतरू न शकणाऱ्या भागांमध्ये शेकडो कमांडो दलांना हवाईमार्गे उतरवण्यात आले आहे
5/12
यांच्यामार्फत ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचे आणि जखमींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. कुनारच्या स्पेशल डिस्ट्रिक्टमध्ये आपत्कालीन छावणी उभारण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/12
तसेच आपत्तीग्रस्त भागाजवळ दोन ऑपरेशनल केंद्र स्थापन करण्यात आले असून, मदतवाटप, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार आणि बचावकार्याचे समन्वयन येथे केले जात आहे.
7/12
हा भूकंप रविवारी रात्री 11.47 वाजता (भारतीय वेळेनुसार) नंगरहार आणि कुनार प्रांतात जाणवला. फक्त 8 किलोमीटर (5 मैल) खोलीवर झालेला हा उथळ भूकंप असल्यामुळे विध्वंस अधिक झाला
8/12
काही मिनिटांतच नंगरहार प्रांतातील बसावलच्या उत्तरेला 4.5 तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर 4.3 ते 5.2 तीव्रतेचे अनेक आफ्टरशॉक्स नोंदवले गेले.
9/12
अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) माहितीनुसार, पहिल्या धक्क्याचे केंद्र जलालाबाद शहरापासून अंदाजे 27 किलोमीटर ईशान्येला होते.
10/12
पाकिस्तान सीमेजवळील जलालाबाद हे अफगाणिस्तानातील महत्त्वाचे व्यापारी शहर असून, सुमारे 3 लाख लोकसंख्या असलेल्या या शहराच्या उपनगरातील माती व लाकडाच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
11/12
काबूलमधून बोलताना अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च मदत अधिकारी इंद्रिका रत्वत्ते यांनी सांगितले की, “भूकंपग्रस्त डोंगराळ प्रांतांमध्ये बहुसंख्य घरे ही मातीची व लाकडी छपरांची असल्याने नुकसान अधिक झाले आहे.”
12/12
जेव्हा भिंती कोसळतात, तेव्हा छप्पर लोकांवर कोसळतं. त्यामुळे लोकांचा मृत्यू होतो किंवा ते गुदमरून अडकतात,” असे रत्वत्ते यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की आपत्ती रात्रीच्या वेळी आली, तेव्हा बहुतांश लोक झोपलेले असल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
Published at : 03 Sep 2025 12:07 PM (IST)