नादखुळा... जिल्हा परिषद विद्यार्थ्याची 'नवोदय'साठी निवड; गावातून वाजत-गाजत मिरवणूक, मुलींची लेझीम
देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, सांगली, जालना येथील ग्रामीण भागातील तरुणांनी यश मिळवले.
Continues below advertisement

Washim ZP school studetn navoday
Continues below advertisement
1/8
देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, सांगली, जालना येथील ग्रामीण भागातील तरुणांनी यश मिळवले.
2/8
आपल्या गावचा लेक सनदी अधिकारी झाल्याचा आनंद गावकऱ्यांना झाला, त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या घरी सत्कारासाठी रांगा लागल्या, मिरवणुकीही निघाल्या.
3/8
एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेच्या निकालानंतर अनेक ठिकाणी अशारितीने यश साजरे केले जाते. गावात युवकाची मिरवणूक निघते. गावाची छाती अभिमानाने फुगते.
4/8
आता, वाशिम जिल्ह्यात चक्क एका 5 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे.
5/8
जिल्ह्याच्या कोठारी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी 'नवोदय' विद्यालयात पुढील शिक्षण घेण्यासाठी पात्र झाल्याने गावातून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
Continues below advertisement
6/8
गेल्या पाच वर्षापासून शाळेतील एकाही विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली नव्हती. त्यामुळे, पाच वर्षानंतर महेश ठाकरे हा विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरल्याने ग्रामस्थांनी हटके आनंद व्यक्त केला.
7/8
गावकऱ्यांनी महेश ठाकरेची गावातून दुचाकीवर वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावेळी, त्याचे मार्गदर्शक शिक्षक शंकर भुजबळ यांचाही सत्कार करण्यात आला.
8/8
मिरवणुकीत ढोल, ताशा, सनई आणि शाळेतील मुलींची लेझीमही पाहायला मिळाली. तर, महेश ठाकरेच्या नवोदय निवडीचा डिजिटल फलकही झळकवण्यात आला.
Published at : 21 Mar 2026 05:53 PM (IST)