जेसीबी अन् स्कॉर्पिओ कारचा विचित्र अपघात, स्थानिकांनी घेतली धाव; 1 ठार 2 गंभीर जखमी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये अपघाताची भीषण घटना घडली.

Scorpio and jcb accident in washim
1/7
वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये अपघाताची भीषण घटना घडली.
2/7
स्कॉर्पिओ आणि जेसीबीच्या या अपघातात 1 जण ठार झाला असून इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3/7
अपघातातील स्कॉर्पिओ लोणार तालुक्यातील पांग्राडोळे येथील असून स्कार्पिओ लोणारच्या दिशेने जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला.
4/7
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी वाशिमच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
5/7
अपघातानंतर काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, चक्क जेसीबीला स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण कसे सुटले याचा तपास पोलीस करत आहेत.
6/7
दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने मदतासाठी अडथळे येत होते.
7/7
दरम्यान, अपघातातील स्कॉर्पिओचा नंबर एम एच.28. व्ही 9293 आहे.
Published at : 25 Mar 2025 09:46 PM (IST)