Bhiwandi Building Collapse : भिवंडीत दोन मजली इमारतीचा पहिला मजला कोसळला, एकाचा मृत्यू
Bhiwandi Building Collapse भिवंडीच्या खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.
Bhiwandi Building Collapse
1/9
भिवंडी शहरालगतच्या ग्रामीण पट्ट्यातील खाडीपार भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंड परिसरातील दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळला.
2/9
यामुळे तळ मजल्यावरील कापडाच्या दुकानात झोपलेल्या एकाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला.
3/9
आज (27 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
4/9
मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असं मृतांचं नाव आहे.
5/9
आहे. तर अशरफ नावाच्या 22 वर्षीय तरुणाला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
6/9
त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपसारासाठी दाखल करण्यात आलं.
7/9
दुर्घटनाग्रस्त दोन मजली इमारत काटई ग्रामपंचायत हद्दीतील असून 30 ते 35 वर्ष जुनी आहे.
8/9
या इमारतीमध्ये व्यापारी गाळे आणि कार्यलय, गोदाम होती.
9/9
यामध्ये कापडाचे गोडाऊन तसंच टेक्स्टाईल कंपन्यांचे कार्यलय होतं.
Published at : 27 Jan 2023 04:06 PM (IST)