धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट

Ambernath fridge blast
1/7
अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरातील ईश्वर रेसिडेन्सी या गृह संकुलात दुसऱ्या मजल्यावर एका घरात भीषण आग लागल्याची घटना घडली.
2/7
या भीषण आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका घरात फ्रिजमध्ये बॅटरीचा स्फोट झाला आणि त्यातून ही आगीची घटना घडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
3/7
आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
4/7
अंबरनाथमधील या आगीच्या दुर्घटनेत घरातील संसार जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
5/7
आगीच्या घटनेनंतर घरातील सदस्यांनी उरलं सुरलं सामान घराबाहेर काढण्यासाठी कसरत केली,
6/7
दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा घरातील फ्रीजच्या अनुषंगाने सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
7/7
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गोरेगावात रात्री 3 वाजता फ्रीजचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. तेव्हा आगीच्या दुर्घटनेत तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Published at : 11 Feb 2026 07:43 PM (IST)