शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजू शेट्टी यांनी विरोध केला. या आंदोलनामुळे पुणे सोलापूर महामार्ग भरती झालेला जवळपास दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

Rasta Roko protest on the Pune Solapur Highway against Shaktipeeth
1/10
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
2/10
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होवून शक्तिपीठ महामार्गास विरोध केला आहे.
3/10
रणरणत्या उन्हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला.
4/10
संत सावता माळी यांची संजीवन समाधी असलेल्या अरणसह पंचक्रोशीच्या गावातील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग बंद करत आंदोलन केले.
5/10
अरण गावातील 75 वर्षीय रतन निवृत्ती पाटील या वृद्ध शेतकरी महिलेनं तळपत्या उन्हात रस्त्यावर बसून या महामार्गास विरोध केला.
6/10
महामार्गावर रास्ता रोकोवरून राजू शेट्टी आणि सोलापूर पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
7/10
पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजू शेट्टी संतप्त झाले.
8/10
बिनमुदत आंदोलन करणार आहोत, काय करणार सांगा अशी विचारणा करत पोलिस नरमल्याचे दिसून आले.
9/10
शक्तिपीठला सरकारकडून जोर लावण्यात आल्यानंतर बाधित जिल्ह्यातून विरोध वाढत चालला आहे.
10/10
कोल्हापूर जिल्ह्यात 19 मे रोजी सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Published at : 17 May 2026 12:38 PM (IST)