अंगावरचं पांघरुन सुद्धा गेलं, काहीच राहिलं नाही; पुरामुळे शाळेत स्थलांतरीत, आजी-आजोबानं फोडला टाहो

सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचं चित्र सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग तब्बल 1 लाख क्युसेक इतका आहे.

Madha flood sina river heavy rain

1/11
सोलापूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचं चित्र सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग तब्बल 1 लाख तर वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग 75,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे.
2/11
उजनीतून वाढवलेल्या पंढरपुरामळे सहाव्यांदा पुराचा धोका निर्माण झाला असून माढा तालुक्यातील सीना नदीच्य रौद्र रुपामुळे तिसऱ्यांदा अनेक गावात पूर आल्याचं चित्र आहे.
3/11
पंढरपुरात आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने चंद्रभागेत हे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असून भीमा नदीत येणारे उजनी धरणाचे पाणी व नीरा नदीत येणारे वीर धरणाचे पाणी हे एकत्रितपणे निरा नरसिंगपूरपासून पंढरपूर कडे भीमा नदीत येत असते ..
4/11
सोलापूर जिल्ह्यात एकंदरीत सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी असून न मोजता येणारे पावसाचे पाणी ही मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यातून चंद्रभागेकडे येत असल्याने चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढू झाली आहे.
5/11
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी माढा तालुक्यात भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर आज पुन्हा येथील सीना नदीला पूर आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
6/11
प्रशासनाने ज्या गावात पाणी शिरलं होतं, त्या गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून स्थलांतरीत केले आहे, उंदरगाव येथील पुनर्वसन कॅम्पमध्येही लोक लेकराबाळांसह आपला जीव मुठीत धरुन आहेत.
7/11
पहिला पूर संपेपर्यंत दुसरा पूर येऊ लागल्याने लोक पुन्हा एकदा उंदरगाव येथील पुनर्वसन कॅम्प मध्ये येऊ लागली आहेत. त्यामध्ये, लहान मुले, महिलाही गेल्या 4 दिवसांपासून संसार मांडून आहेत.
8/11
येथील कँपात घरी सांभाळणारे कोणीच नसल्याने राधाबाई आणि किसन शिंदे हे जोडपे गेल्या 8 दिवसांपासून निवाऱ्याला आहे. असहाय झालेल्या दांपत्याने एबीपी माझाशी बोलताना अक्षरश: टाहो फोडला.
9/11
आम्हाला सांभाळणारे कोणीच नाही असे सांगताना या वृद्ध दांपत्याच्या डोळ्यातील अश्रू संपत नव्हते, आजी आणि आजोबा दोघांनाही रडू कोसळले होते. आपल्या घरात पाणी शिरलंय, अंगावरचं पांघरुनसुद्ध उरलं नाही, असे सांगताना आजीला रडू कोसळलं
10/11
आपल्या पदराने डोळ्यातील पाणी पुसणारी आजी, नदीच्या पुराचं पाणी आपल्या गावातून, घरातून कधी ओसरणार एवढीच अपेक्षा बाळगून होती.
11/11
सरकारची कुठलीही मदत अद्याप या जोडप्यापर्यंत आणि उंदरगावातील कॅम्पमध्ये पोहोचली नव्हती. केवळ थोड्याफार औषध-गोळ्या देण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे.
Sponsored Links by Taboola