Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी वारीसाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा महासागर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पाहा PHOTOS
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली.

Ashadhi Ekadashi 2026
1/7
गेल्या महिन्याभरापासून विठ्ठलभक्त तसेच, वारकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो आषाढी दिवस आज साजरा केला जातोय.
2/7
आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेलाय.
3/7
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली.
4/7
पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.
5/7
यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला.
6/7
यावेळी देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोषाख परिधान करण्यात आला.
7/7
त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेचीही पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली.
Published at : 25 Jul 2026 08:10 AM (IST)