तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा
तळकोकण म्हणजे जैवविविधतेचे भंडार म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. पर्यटकांसाठी निसर्ग सौंदर्याचा आनंद देणारं ठिकण म्हणजे कोकण. याच कोकणात सापांच्या दुर्मिळ प्रजाती आढळून येतात.
Snake in sindhudurg
1/7
तळकोकण म्हणजे जैवविविधतेचे भंडार म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. पर्यटकांसाठी निसर्ग सौंदर्याचा आनंद देणारं ठिकण म्हणजे कोकण. याच कोकणात सापांच्या दुर्मिळ प्रजाती आढळून येतात.
2/7
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. महाराष्ट्रात हा साप फक्त तिलारीच्या खोऱ्यात आढळतो.
3/7
नाकाड्या चापडा (Hump Nosed Pit Viper) असलेल्या या सापांच्या दुर्मिळ प्रजातीची तिलारीमधील केर-भेकुर्ली भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच नोंद झाली आहे.
4/7
वन्यजीव अभ्यासक तुषार देसाई यांना हा दुर्मीळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. नाकाड्या चापडा विषारी सापांमधील जगभरात प्रसिद्ध असलेल्या वर्गातील व्हायपर सापांचा अत्यंत दुर्मीळ साप आहे.
5/7
हा साप इतर पिट व्हायपरसारखा असून हा झाडावर न राहाता खाली जमिनीवरच आढळतो. तपकिरी करड्या रंगाच्या या सापावर काळे काळे ठिपके पाहायला मिळतात.
6/7
पालापाचोळ्यामध्ये, झाडांच्या मुळांजवळ, दगडांखाली हा साप दिसून येतो. मात्र, हा साप केवळ अतिदाट, घनदाट जंगलात आढळतो.
7/7
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळकोकणात निसर्गरम्य ठिकाणासह घनदाट जंगल पाहायला मिळते, त्यामुळेच तिथं हा साप आढळून आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 24 Jun 2025 06:40 PM (IST)