Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan Fishing : मालवणात तब्बल आठ वर्षांनी कर्ली माशाचा बंपर कॅच, मात्र दर चांगला न मिळाल्याने मच्छिमार हिरमुसले
सिंधुदुर्गातील मालवणात तब्बल आठ वर्षांनी कर्ली माशाचा बंपर कॅच मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र अपेक्षित भाव न मिळाल्याने मच्छिमार हिरमुसले आहेत.
गीलनेटधारक पारंपरिक मच्छिमारांना मोठ्या प्रमाणात कर्ली मासे मिळाले.
कर्ली मासे घेऊन मच्छिमार मोठ्या आनंदात किनाऱ्यावर आले.
मात्र बाजारात कर्लीच्या दराचे घसरते आकडे पाहून मच्छिमारांच्या आनंदावर विरजण पडले.
सुरुवातीला फक्त दहा ते बारा टोपल्यांना प्रती टोपली पाचशे ते सहाशे भाव मिळाला.
त्यानंतर काही क्षणातच कर्लीच्या दरात कमालीची घसरण सुरु झाली.
अन् हा भाव टोपलीमागे 200 रुपयांवर येऊन ठेपला.
दर घसरल्यामुळे मच्छिमारांची घोर निराशा झाली.
कोकणात जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरु झाली आहे.
दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता आहे.