पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास सक्त मनाई असतानाही, काही पर्यटक नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. उत्साहाच्या भरात वाहने समुद्रकिनारी नेतात.
Continues below advertisement

Vagator sea fortuner JCB
Continues below advertisement
1/8
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास सक्त मनाई असतानाही, काही पर्यटक नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. उत्साहाच्या भरात वाहने समुद्रकिनारी नेतात.
2/8
गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपली कार थेट समुद्राच्या लाटांजवळ नेण्याचा प्रयत्न केला. फॉर्च्यूनर चालकास अंदाज न आल्याने कार समुद्रात फसली.
3/8
समुद्राचा अंदाज न आल्याने या पर्यटकांची कार वाळूत पूर्णपणे रुतली. मौजमजा करण्याच्या नादात पर्यटकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार न केल्याने ही परिस्थिती ओढवली.
4/8
कार वाळूत अडकल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी बाहेर काढता येईना, त्यामुळे कारमालक पर्यटकांची तारांबळ उडाली.
5/8
पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाची किंवा क्रेनची मदत घेण्याऐवजी स्वतःच प्रयत्न सुरू केले. त्यांनी तिथे असलेल्या दुसऱ्या एका कारला दोरी बांधून अडकलेली कार बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार बाहेर येईना.
Continues below advertisement
6/8
अखेर पर्यटकांनी स्थानिकांच्या मदतीने जेसीबीला बोलावून कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जेसीबीच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली.
7/8
जेसीबीने कार बाहेर काढत असताना हे दृश्य पाहायला पर्यटकांनी गर्दी केली होती, तर स्थानिक पोलीस प्रशासन व सुरक्षा रक्षकही तैनात होते.
8/8
दरम्यान, आपली समुद्रात अडकलेली फॉर्च्यूनर कार बाहेर निघाल्याचा आनंद पर्यटकाच्या चेहऱ्यावर दिसून आला, त्यानंतर कारमधील पाणीही बाहेर काढण्यात आले.
Published at : 22 Mar 2026 07:35 PM (IST)