एक्स्प्लोर
Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांनी 'त्या' महिलेमुळे संपवलं आयुष्य; सुसाईड नोट सापडली, महिलेचं नाव लिहिलं!
Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirish Valsangkar
1/8

Shirish Valsangkar: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आत्महत्या केली.
2/8

शिरीष वळसंगकरांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबारात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
3/8

डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली.
4/8

दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आता नवीन ट्विस्ट आला आहे.
5/8

डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6/8

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
7/8

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केलाय.
8/8

सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आली आहे.
Published at : 20 Apr 2025 12:20 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
व्यापार-उद्योग
सोलापूर

















