Satara Phaltan Car Accident: फलटणजवळ कारचा भीषण अपघात; कारमधील एका हॉस्टेलच्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, PHOTO
Satara Phaltan Car Accident: फलटण तालुक्यात वाठारनिंबाळकर हद्दीत स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
Continues below advertisement

Satara Phaltan Car Accident
Continues below advertisement
1/5
Satara Phaltan Car Accident: फलटण तालुक्यात वाठारनिंबाळकर हद्दीत स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
2/5
हॉटेलमध्ये जेवण करून हॉस्टेलकडे परतत असताना चालक मोहम्मद हुसेन याचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या कठड्याला जोरदार धडकून पलटी झाली.
3/5
या अपघातात चालक मोहम्मद हुसेन (अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) यांचा मृत्यू झाला.
4/5
जखमी नयन लोंगाणी, सौरभ कुमार व एम.डी. मितारे यांच्यावर फलटण व बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
5/5
सदर घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Published at : 24 Jul 2026 12:15 PM (IST)