Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव घेण्यात आला. यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला.
Continues below advertisement
शिवजयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव
Continues below advertisement
1/6
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या मशाल महोत्सवाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपस्थित होते.
2/6
शिवजयंतीचा उत्साह दोन दिवस आधीपासूनच सर्वत्र पाहायला मिळत असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज शेकडो मशालिनी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा उजळला आहे.
3/6
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव घेण्यात आला. यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला.
4/6
शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.अजिंक्यतारा किल्ल्याचे गड पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
5/6
पारंपारिक वाद्यांच्या गजरात किल्ल्यावर अजिंक्यतारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या आकर्षक अशी विद्युत रोषणाई आलीये.
Continues below advertisement
6/6
या कार्यक्रमासाठी शेकडो मावळे आणि नागरीक हातात मशाली घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या बुरुजावर उभे होते यामुळे अजिंक्यतारा किल्ला उजळून निघाला.
Published at : 19 Feb 2026 12:02 AM (IST)
= 6">