गुणवत्ता फक्त मोठ्या शहरात नसते हे सांगलीच्या स्मृतीनं दाखवून दिलं; चंद्रकांतदादांकडून आई-वडिलांचं विशेष अभिनंदन
Smriti Mandhana: तुमच्या लेकीनं आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. केवळ सांगलीकरांनाच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले.
Continues below advertisement
Chandrakant Patil met Smriti Maandhana parents in Sangli
Continues below advertisement
1/12
गुणवत्ता फक्त मोठ्या शहरात नसते हे सांगलीच्या स्मृतीनं दाखवून दिल्याची प्रतिक्रिया सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
2/12
चंद्रकांत पाटील यांनी स्मृती मानधनाच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे विशेष आभार मानले.
3/12
तुमच्या लेकीनं आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला. केवळ सांगलीकरांनाच नाही; तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले.
4/12
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला.
5/12
टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती माननाच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी तिच्या आई-वडिलांचं विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते.
Continues below advertisement
6/12
स्मृती आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. त्यामुळं प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
7/12
मुलींच्या कामगिरीमुळं ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल, असेही त्यांनी नमूद केले.
8/12
त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि यातून देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
9/12
अनुभवाच्या जोरावर संघात दिलेलं योगदान यामुळं फक्त सांगलीकरांनाच नाही तर संपूर्ण भारतीयांना स्मृतीचा अभिमान वाटतो अशी भावना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
10/12
यावेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास आणि आई स्मिता, भाऊ श्रावण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
11/12
भारतीय महिला संघानं 2005 आणि 2017 यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. मात्र विश्वचषकाला गवसणी घालण्यात अपयश आलं होतं.
12/12
यंदा भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सात वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत धूळ चारत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली होती आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं
Published at : 06 Nov 2025 02:36 PM (IST)