म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका : धैर्यशील माने
Dhairyasheel Mane: खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कुठेच दिसत नाही या मतदारसंघातील लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने खासदार माने यांनी हे विधान केले आणि सभेत एकच हशा पिकला.
Continues below advertisement
Dhairyasheel Mane
Continues below advertisement
1/9
एखाद्याच्या म्हशीला रेडकू झालं तरी बोलवा, खासदार तिथे येईल पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली.
2/9
हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यात कामेरी गावातील भाजप युवा नेते जयराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार धैर्यशील माने बोलत होते.
3/9
खासदार धैर्यशील माने मतदारसंघात कुठेच दिसत नाही या मतदारसंघातील लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने खासदार माने यांनी हे विधान केले आणि सभेत एकच हशा पिकला.
4/9
लोकसभा निवडणुकीत खासदार माने मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप झाला होता.
5/9
त्यांना मतदारसंघातील विविध गावांमध्ये अडवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता.
Continues below advertisement
6/9
त्यामुळे हाच धागा पकडत त्यांनी खासदार कुठेच दिसत नाही, असे म्हणू नका असे वक्तव्य केलं.
7/9
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव फडणवीस ऐवजी जर देशमुख, पाटील असते तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
8/9
आता सदाभाऊ खोत आमदार आहे म्हणून माझ्या मागे गडी आहेत, असे ते म्हणाले.
9/9
पण सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवावी आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असा एकही गडी कधी म्हणत नाही, असेही ते म्हणाले.
Published at : 13 Sep 2025 04:18 PM (IST)