Baidgada Sharyat Sangli: भिर्रर्र...हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक बैलजोडीने मारले मैदान; सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत पटकावली मानाची फॉर्च्युनर

Baidgada Sharyat Sangli: देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन केलं होतं. यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.

Continues below advertisement

Baidgada Sharyat Sangli

Continues below advertisement
1/9
Baidgada Sharyat Sangli: देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचे पैलवान चंद्रहार पाटलांकडून 500 एकर मैदानावर आयोजन केलं होतं.
2/9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैल शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली.
3/9
तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन आणि सर्जा या बैलजोडीने जिंकली.
4/9
सदर शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली आहे.
5/9
बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातला सगळ्यात मोठं मैदान सांगलीच्या तासगाव-बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे पार पडलं.फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या.
Continues below advertisement
6/9
लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक, अश्या पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे.
7/9
बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.
8/9
बैलगाड्या शर्यतीवर न्यायालयाने बंदी आणली, त्यानंतर हा आपला सांस्कृतिक ठेवा असल्याने ही शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळेच ही स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकली. पै.चंद्रहार पाटलांच्या पुढाकाराने पैलवानांच्या तालमींना आपल्याला ताकद द्यायची आहे, तसेच त्यांच्या साथीने बैलगाड्याबांबतचे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
9/9
शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळेच माझी ओळख काऊज मॅन अशीही झाली. या शर्यतीच्या आयोजनातून गोवंशाचे जतन करण्याचे काम होत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
Sponsored Links by Taboola