Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Guhagar Wild cat news: गुहागर तालुक्यातील हेदवी विद्यानिकेतन विद्यालयात दुर्मिळ कस्तुरी मांजर दाखल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल
Continues below advertisement

Guhagar Wild cat news
Continues below advertisement
1/5
कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी अनेक दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन झाला आहे अशाच प्रकारे आता गुहागर तालुक्यातील हेदवी येथील विद्यानिकेतन विद्यालयाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी दुर्मिळ कस्तुरी मांजर (सिव्हेट) आढळून आल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. या दुर्मिळ वन्यप्राण्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
2/5
शाळेच्या परिसरात अचानक हे प्राणी दिसताच सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.
3/5
कस्तुरी मांजर हा कोकणातील जंगल परिसरात अधूनमधून आढळणारा, अत्यंत लाजाळू आणि निशाचर स्वभावाचा वन्यप्राणी आहे. ग्रामीण भागात त्याला 'जावडी मांजर' या नावानेही ओळखले जाते. जंगलातील अधिवास कमी होणे, अन्नाच्या शोधात भटकंती किंवा पावसाळ्यातील बदलत्या परिस्थितीमुळे हे प्राणी कधीकधी मानवी वस्तीकडे वळतात, असे जाणकारांचे मत आहे.
4/5
वन्यजीवप्रेमींनी नागरिकांना अशा प्राण्यांना कोणतीही इजा न करता सुरक्षित अंतर ठेवण्याचे आणि त्वरित वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. कस्तुरी मांजर हे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे वन्यजीव असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
5/5
हेदवी विद्यानिकेतन विद्यालयातील या अनोख्या घटनेची परिसरात दिवसभर चर्चा रंगली असून विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळाच आणि संस्मरणीय अनुभव ठरला.
Continues below advertisement
Published at : 02 Aug 2026 02:06 PM (IST)