रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक बंद, आंबा घाटातील वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Traffic closed on Ratnagiri Kolhapur road: वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Traffic closed on Ratnagiri Kolhapur road
Continues below advertisement
1/10
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे.
2/10
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
3/10
मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
4/10
वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
5/10
मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
6/10
मलबा हटवण्यासाठी दोन जेसीबी लावण्यात आले आहेत.
7/10
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु आहे.
8/10
पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे.
9/10
राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे मोसमात पहिल्यांदाच उघडले आहेत.
10/10
धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Published at : 18 Aug 2025 12:32 PM (IST)