Mumbai Goa Highway Car Accident: कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर; चालकाचा थरारक बचाव, मुंबई-गोवा महामार्गावर काय घडलं?, PHOTO
Mumbai Goa Highway Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continues below advertisement

Mumbai Goa Highway Car Accident
Continues below advertisement
1/6
Mumbai Goa Highway Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2/6
खेडजवळ भरधाव वेगात असलेली एक कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन अडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
3/6
वेगावर नियंत्रण सुटल्याने ही कार थेट नदीकाठच्या कठड्याकडे झेपावली होती. मात्र शेवटच्या क्षणी गाडी कठड्यावर अडकली आणि चालकाचा थरारक बचाव झाला. जर कार पुढे गेली असती तर ती तब्बल 100 ते 150 फूट खोल नदीत कोसळण्याची शक्यता होती.
4/6
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तर काही काळ वाहतूकही मंदावली होती.
5/6
माहिती मिळताच खेड पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Continues below advertisement
6/6
या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Published at : 19 Mar 2026 01:50 PM (IST)